एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रांतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळेतील विधार्थ्यांना शासन निर्णय आदिवासी विकास,
२०१८/MN/८५/१९ दिनांक १९-१०-२०१८ अन्वये भारतीय संविधनाचे कलम 275(१) या योजने अंतर्गत एकलव्य मोडेल रेसिडेंसी स्कूल येथे मध्यवर्ती स्वयंपाक गृह कार्यान्वित करण्यात आले आहे.
मध्यवर्ती स्वयंपाकगृह स्थापनेचा व आश्रम शाळेतील विधार्थ्यांना भोजन पुरवण्याच्या सामंजस्य करारानुसार सन २०१९-२० पासून पांच वर्षाच्या कालावधी साठी त्रिशक्ती मुंबई या संस्थेला देण्यात आला आहे. त्यानुसार नंदुरबार प्रकल्पातील २३ आश्रमशाळेतील १७४४ विधार्थ्यांना व तळोदा प्रकल्पातील ९ आश्रमशाळेतिल ३६७६ अश्या एकूण १३४२० विधार्थ्यांना सकाळचा नास्ता, दुपारचे जेवण, दुपारी ३:00 वाजता स्नेक्स व संध्याकाळी 6:00 ते 7:00 च्या वेळेत जेवण असा भोजन पुरवठा केला जाता.
निवासी व अनिवासी विधार्थ्यांना वेळेवर निरोगी ताजे आणि स्वच्छ भोजन देणारी अद्यावत प्रणाली मध्यवर्ती स्वयंपाकगृहात स्थापन करण्यात आली आहे.
दररोज ताजे व गरम नास्ता व भोजन शाळेवर पहोंच करण्या साठी अध्यावत अश्या वाहनाची या संस्था मार्फत व्यवस्था केलेली आहे. सदर वाहना मध्ये वाहनाचा निश्चित स्थान मिळविण्यासाठी वाहना रूट ट्रेकिंग परिवहन व्यवस्था करण्यात आलेली आहे. सदरील वाहन तीन वेळा भोजन व नास्ता पोहच करतात तसेच विधार्थ्यांना चांगले व सकस अन्न मिळावे व अन्याची गुणवत्ता टिकुन राहण्याकमी अठवड्याचा मेनू ठरवून देण्यात आलेला आहे व त्याप्रमाण कार्यवाही करण्यात येते.
Thank You!
Your inquiry is received and we will contact you soon