महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम दिशेला गुजरात / मध्यप्रदेश राज्याच्या सिमेवर नंदुरबार हा जिल्हा सातपुडयाच्या कुशीत वसलेला आहे. नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती धुळे जिल्ह्याचे विभाजन करून १ जुलै १९९८
रोजी करण्यात आली. त्यात सहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला. नंदुरबार, नवापुर, शहादा, तळोदा, धडगाव व अक्कलकुवा या तालुक्यांच्या मिळून नंदुरबार जिल्ह्याची निर्मित करण्यात आली.
नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या पैकी ६९.२८ % लोकसंख्या ही आदिवासी आहे. त्या मुळे आदिवासी लोकांच्या विकासा साठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांची निर्मिती करण्यात आली.
राज्य शासनाने आदिवासीसांठी एक स्वतंत्र जनजाती क्षेत्र उपयोजना १९७५-७६ मध्ये तयार केली त्यानुसार शासन निर्णय क्रमांक :- टी.एस.पी -१०७३/१८१५/डी.एस.आर.व्ही./दि.०१/०४/१९७७ नुसार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार या कार्यालयाची स्थापना करण्यात आली. त्या नंतर आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक: १०८९/प्र.क्र.७९९/का-१५/दि.१५ जानेवारी १९९२ नुसार या कार्यालयाची पूर्नरचना करण्यात आली.
नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार तळोदा हे दोन एकात्मिक आदिवसी विकास प्रकल्प कर्यालय कार्यरत आहेत. त्यात नंदुर्बार प्रकल्पात नवापुर, शाहदा, नंदुर्बार ह्या तालुक्यांचा समावेश होतो. सन १९९८ पुर्वि तत्कालिन धुळे जिल्ह्यात नंदुर्बारचा समावेश असल्याने नंदुर्बार प्रकल्पात धुळे जिल्ह्यतील शिर्पुर, साक्रि, धुळे, व शिंदखेडा ह्या तालुक्यांचा समावेश होता. त्यानंतर दिनांक १५ ऑग्स्ट २०१२ रोजी नंदुर्बार प्रकल्पाची निर्मिति कर्ण्यात आली. त्यात धुळे प्रकल्पात शिर्पुर, साक्रि, धुळे, व शिंदखेडा ह्या तालुक्यांचा समावेश करण्यात आला.
नंदुर्बार प्रकल्पात सदयस्थटतीत नंदुर्बार, नवापुर, शहादा ह्या तीन तालुक्यांचा समावेश आहे. ह्या प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रंतर्गत शासकिय आश्रम्शाला ३२, अनुदानित आश्रम्शळा ३०, व २९ शासकिय वस्तिग्रुह कार्यरत आहेत. त्यात शासकिय आश्रम्शाळेत १३४५१,अनुदानित आश्रम्शाळेत १५८२४ व शासकिय वस्तिग्रुहात ४७६७ विध्यार्थी शिक्षण घेत आहेत. आदिवासी विध्यार्थ्यांचा सर्वगिण विकासासाठी केंद्रस्तरावरुन व राज्यस्तरावरुन विविध योजना राबवल्या जात अहेत. त्यात सेंट्रल किचन योजनेद्वारे ९७४४ विध्यार्थाना दर्रोज सकाळि नाश्टा, दुपारी जेवण, दुपारी ३:०० वाजता स्नेक्स व संध्याकाळी ६:०० ते ७:०० च्या वेळेत जेवण असा भोजन पुर्वठा केला जातो.
विध्यार्थ्यांचा शिक्षणिक विकासासाठी कराड पाथ, विज्ञान विषयासाठी एक्लव्य विज्ञान शिक्षण इयत्ता १ ते ८ वी साठी माइंड स्पार्क या संस्थेद्वारे लेपटोप चा पुरवठा कर्ण्यात येउन विध्यार्थ्यांना ऑनलाइन व प्रत्यक्ष हाताळणी द्वारे अध्ययन करणे ह्याविषयी प्रयत्न करण्यात येत आहेत.
आमच्या संस्थाची रचना
Thank You!
Your inquiry is received and we will contact you soon